Orange City नागपूर फिरायचं आहे? मग 'ही' 10 ठिकाणं जरूर पाहा!

 नागपूरमधलं 18व्या शतकातलं टेकडी गणपती मंदिर प्रसिद्ध असून, ते रेल्वे स्टेशनजवळच्या टेकडीवर आहे.

फुटाळा तलाव हे नागपुरातलं अत्यंत सुंदर स्थळ असून, तिथलं वातावरण आल्हाददायक असतं.

फुटाळा तलावाजवळच सातपुडा Botanical Garden असून, तिथे अनेक दुर्मीळ वनस्पती आहेत.

सेमिनरी हिल्सवरून नागपूरचं विहंगम दृश्य दिसतं. तिथे Japanese Garden देखील आहे.

नागपूरच्या जवळच शहरातला सर्वांत मोठा, मनमोहक अंबाझरी तलाव आहे. तिथे मोठी बागही आहे.

 नागपूरपासून 80 किलोमीटर्सवर रामटेकजवळच्या पेंच नदीवर असलेल्या तोतलाडोह धरणाचा परिसर सुंदर आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा जिथे घेतली, त्या दीक्षाभूमीला भेट द्यायलाच हवी.

नागपुरातल्या मोतिबाग परिसरात असलेलं नॅरो गेज रेल्वे म्युझियम पाहण्यासारखं आहे.

नागपूरपासून 86 किलोमीटर्सवरचं पेंच राष्ट्रीय अभयारण्य आवर्जून भेट देण्यासारखं आहे.

नागपूरच्या सक्करदरा भागातलं लेक गार्डन अत्यंत नयनरम्य आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?