उचकी घालवण्याचे 10 रामबाण उपाय

एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. असे केल्याने फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याचा प्रयत्न करेल. अशाने उचकी आपोआप थांबेल.

उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा, याने उचकी थांबेल.  तसेच साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकून ते थोड थोड प्यायल्याने उचकी बंद होते.

उचकी आल्यावर एक चमचा लिंबूचा रस आणि एक चमचा मध टाकून मिक्स करून त्याचे चाटण करून खा. याने उचकी थांबेल.

बऱ्याचदा भरभर खाल्ल्याने उचकी लागते, तेव्हा जेवताना हळूहळू आणि प्रत्येक घास चावून खा असे केल्यास उचकी थांबते.

उचकी लागल्यावर एक चमचा चॉकलेट पावडर खा. असे केल्याने थोड्यावेळात उचकी बंद होते.

पाण्यात मीठ टाकून ते घोट घोट प्या. यामुळे उचकीची समस्या त्वरीत बंद होते.

तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोंडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. मग त्यावर एक घोट पाणी प्या. असे केल्याने उचकी बंद होईल. 

उचकी येणाऱ्या व्यक्तीला उलटे अंक मोजायला लावा. मग अचानक त्या व्यक्तीला घाबरवा असे कल्याने उचकी जाते.

उचकी आल्यावर त्वरीत टॉमॅटो चावून खा.

उचकी आल्यास एक चमचा पीनट बटर खा. याने श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल.