पुण्याजवळचे 10 उत्तम टुरिस्ट स्पॉट्स

पुण्याजवळच्या खडकवासला धरणाचा जलाशय नयनरम्य असून, तिथे वेगवेगळे खाद्यपदार्थही मिळतात

खडकवासल्यापासून पुढे सिंहगड हे एकदिवसीय ट्रिपसाठी उत्तम ऐतिहासिक व रम्य ठिकाण आहे

लोणावळा-खंडाळा हे ऑल टाइम हिट टुरिस्ट स्पॉट्स आहेत

लोणावळ्याजवळ कार्ला येथील पुरातन बौद्ध गुंफा सुंदर असून, तेथे एकवीरा मंदिरही आहे

पुण्यापासून 50 किमीवर असलेलं पानशेत धरणदेखील उत्तम पर्यटनस्थळ आहे

पुण्यापासून 47 किमीवर असलेलं कामशेत हे ठिकाण निसर्गरम्य आणि नितांत सुंदर आहे

पुण्यापासून 57 किमीवरचं लवासा हे तलावांचं शहर आहे. अॅडव्हेंचर स्पोर्ट्सदेखील तेथे आहेत

इतिहासाची साक्ष देणारा लोहगड हा किल्ला आणि आसपासचा परिसर निसर्गसौंदर्यानेही नटलेला आहे

 लोणावळ्यापासून 20 किमीवर असलेला पवना तलाव म्हणजे रिलॅक्सेशनचं उत्तम ठिकाण

मुळशी हे कॅम्पिंग आणि निसर्ग पर्यटनसाठी सुंदर ठिकाण आहे