नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील बेस्ट ठिकाणं कोणती आहेत पाहा. 

कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला भेट देऊन नवीन वर्षाची पवित्र सुरुवात तुम्ही करू शकता. 

अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळ रंकाळा तलाव आहे. या तलावाचा सुंदर असा नजारा, बाजूने बगीचा आणि सेलिब्रेशनसाठी विविध गोष्टी या ठिकाणी मिळतात. 

कोल्हापूर शहरातच असणारे टाऊन हॉल हे वस्तुसंग्रहालय अतिशय उत्तम माहितीचे भांडार आहे. 

 नवीन राजवाडा अर्थात न्यू पॅलेस हे देखील एक संग्रहालय आहे. 

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले टेंबलाई मंदिर या ठिकाणाला देखील तुम्ही भेट देऊ शकता.

श्री क्षेत्र जोतिबा येथे वडणगे, कुशिरे मार्गाने जाताना पोहाळे येथील बुद्धकालीन लेणी हे देखील भेट देण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण आहे.

पुणे-बेंगलोर महामार्गावरून कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ एक उंचच उंच गणेशमूर्ती दिसते. या ठिकाणी सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. 

आंदुर डॅम हा कोल्हापूर पासून 47 किमी लांब असणारा पण एक चांगला पिकनिक स्पॉट ठरू शकतो. या ठिकाणी अगदी कमी किंमतीत जेवण वेगैरेची सोयही होऊ शकते. 

कोल्हापूर शहरापासून 60 किमी लांब असणारा गगनबावडा तालुक्यात गगनगिरी महाराजांचा मठ देखील उत्तम पर्याय आहे.

गगगबावडा तालुक्यातच अतिशय प्राचिन असे मोरजाई पठार हे देखील उत्तम ठिकाण आहे. या पठारावरून परिसरातील दृश्य अतिशय रमणीय दिसते.