लातूरची IAS सून टीना दाबी चर्चेत का असते?

टीना दाबी यांचे वडील हे बीएसएनल मध्ये जनरल मॅनेजर तर आई या आईएस अधिकारी होत्या. 

टीना यांनी 12वीमध्ये राज्यशास्त्र आणि इतिहासात 100 पैकी 100 गुण मिळवले होते.

टीना दाबी यांनी लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेन्स येथून राज्यशास्त्रामध्ये पदवी मिळवली आहे.

2015च्या यूपीएससी परिक्षेत त्या देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या.

टीना दाबी यांनी एप्रिल 2022मध्ये लातूरचे प्रदीप गावंडे (आएएस अधिकारी) यांच्यासोबत विवाह केल्या आणि याप्रकारे त्या लातूरच्या सून झाल्या.

त्याआधी 2018मध्ये त्यांचे लग्न हे त्यांच्याच बॅचचे सेकंड टॉपर राहिलेले आएएएस अतहर आमिर खान यांच्यासोबत झाले होते. 

 लातूरच्या सून टीना दाबी या सध्या राजस्थानमध्ये जैसलमेरच्या जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.

इन्स्टाग्रामवर त्यांचे जवळपास 16 लाख आणि ट्विटरवर 46 हजार फॉलोवर्स आहेत. 

त्यांची बहीण रिया दाबी यासुद्धा आयएएस अधिकारी आहेत.