नेपाळमध्ये 68 प्रवाशांसह विमान कोसळलं
नेपाळमधून मोठी दुर्घटना समोर आली आहे. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
पोखरा विमानतळावर उतरत असताना जुने विमानतळ आणि नवीन विमानतळादरम्यान सेती नदीच्या काठावर हे विमान कोसळले.
या विमानामधून एकूण 72 जण प्रवास करत होते, यातील 45 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
यति एअरलाइन्सचं ATR-72 हे विमान पोखराजवळ कोसळलं.
या विमानातून एकूण 68 प्रवासी आणि 4 विमान कर्मचारी प्रवास करत होते. या 72 जणांमध्ये चार भारतीयांचा देखील समावेश होता.
या विमान अपघातानंतर नेपाळ सरकारकडून मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे.
विमानाने काठमांडूहून पोखरा येथे 68 प्रवाशांसह उड्डाण केलं होतं. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांमध्येच विमान कोसळलं
घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून, बचाव पथक दाखल झालं आहे.
बचाव पथकांकडून विमानात असलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे.