कोणत्याही लग्न समारंभात दागिन्यांना विशेष महत्त्व असतं. दागिन्यांमुळे सौंदर्य खुलून दिसतं, त्याचबरोबर सर्वांसमोर मिरवण्याचीही संधी मिळते.
मोत्यांच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार सध्या मुंबईच्या बाजारात दाखल झाले आहेत. बुगडी, कुडी, नथ, तन्मणी हार, अंगठी, चोकर, चिंचपेटी, बाजूबंद या दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे.
बाजूबंद हा दंडामध्ये घालण्याचा दागिना आहे. मोत्यांचा वापर करून यात नक्षीकाम केलेली असते. मोत्यासह यामध्ये माणिक किंवा इतर स्टोन्स देखील वापरलेले असतात.
मोत्याच्या बांगड्या या प्राचीन काळापासून वापरल्या जातात. मोत्याच्या बांगड्या या शक्यतो हिरव्या बांगड्या सोबत घातल्या जातात. विविध डिझाईनच्या मोती बांगड्यांचा सेट बाजारात उपलब्ध आहे.
चिंचपेटी हा मोत्याचा दागिना सुद्धा गळ्या लगत घातला जातो. चिंचपेटी हार शक्यतो नऊवारी साडीवर घातला जातो.
मोत्याचा हार नऊवारी साडी किंवा सहावारी किंवा इतर कोणत्याही प्रकारची साडी असो त्यावर घातला की एक वेगळाच लुक येतो.
मोत्यांचे पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने दादर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. लोक राजेशाही थाट दाखवणाऱ्या मोत्यांच्या दागिन्यांना अधिक पसंती देतात. 350 रुपये ते 5000 रुपयां पर्यंत अनेक दागिने उपलब्ध आहेत.