ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे नक्की काय?

फक्त प्रेमातच नाही, तर आजारपणातदेखील हृदय तुटतं. ब्रोकन हार्ट सिंड्रोम असं म्हणतात, त्याची लक्षणं पाहुया...

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची ओळक 1990 साली जपानमध्ये झाली. 

व्यक्तीला अचानक मानसिक तणाव आला की, हा आजार होऊ शकतो. 

हृदयाच्या नसांवर अधिक ताण पडल्यामुळे मसल्स कमजोर होतात आणि आजार बळवतो. 

अचानक छातीत दुखायला सुरू होते. सहजरित्या श्वास घेता येत नाही. 

शरीराला अचानक घाम फुटतो आणि चक्कर यायला लागते. 

प्रिय व्यक्ती सोडून गेल्यामुळे ही लक्षणं जाणवतात. त्यामध्ये नातं तुटलेलं असतं. 

पैशांसंबंधी समस्या, नोकरी जाणे, घरगुती हिंसा, यामुळे ब्रोकन हार्ट सिंड्रोमची समस्या निर्माण होते. 

एकंदरीत भावनात्मकदृष्ट्या कमजोर व्यक्तीला अचानकपणे कोणतीही बातमी देऊ नका.