या घरगुती उपायांनी दूर पळवा गुडघेदुखी
वाढत्या वयानुसार गुडघेदुखी सामान्य आहे, परंतु आता तरुण वयातही हा त्रास होतो.
अनेकजण यासाठी वैद्यकीय उपचार घेतात, परंतु बऱ्याचदा औषधं घेऊनही गुडघेदुखी कमी होत नाही.
मात्र तुम्ही घरच्या घरी उपाय करून या त्रासातून मोकळं होऊ शकता.
टाॅवेल किंवा बॅगमध्ये बर्फाचे तुकडे घेऊन वेदनेवर 10 ते 15 मिनिटं हलके प्रेस करा. गुडघेदुखी कमी होईल.
एक चमचा सफरचंदाचा रस पाण्यात घालून ते पाणी नियमित प्यायल्याने गुडघ्याचं दुखणं दूर पळतं.
लाल, काळ्या रंगाची ढोबळी मिरची झाल्यानेही गुडघेदुखी कमी होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आल्याचा काढा गुडघेदुखीवर रामबाण उपाय आहे. पेशींना दुखापत झाली असल्यासही हा काढा परिणामकारक आहे.
हळद गुडघेदुखी, सांधेदुखीवरही प्रभावी आहे. गरम दुधात हळद टाकून प्यायल्यास नक्कीच आराम मिळतो.
गुडघेदुखीवर डाॅक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम, गरम पाण्यानं शेक दिलासही फरक जाणवेल.