'लो बीपी'चं नेमकं कारण आणि उपाय

अंधुक दृष्टी, अस्वस्थ वाटणे, नैराश्य, थंडी वाजून येणे, तहान लागण, श्वास मंद होने लो बीची लक्षणं आहेत.

लो बीपीची समस्या हलक्यात घेतल्यास मेडिकेशन, शॉक, स्ट्रोक आणि हृदय विकार होऊ शकतात.

आहार आणि जीवनशैलीचे योग्य व्यवस्थापन करून कमी रक्तदाब सहज टाळता येतो.

पाण्याच्या कमतरतेमुळे लो बीपीची शक्यता वाढते. दिवसातून किमान 7-8 ग्लास पाणी प्यावे.

लो बीपी असताना आहारात व्हिटॅमिन बी 12, फॉलिक अॅसिड आणि आयर्नने समृद्ध अन्नपदार्थ घ्यावे.

एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी अनेक वेळा थोडे थोडे खात राहावे. 

लो बीपी असल्यास खारट पदार्थ खावे. मिठात असलेले सोडियम रक्तदाब वाढवण्यास मदत करते.

मद्यपान केल्याने अनेकदा रक्तदाब कमी होतो. त्यामुळे दारूपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा.

बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे संक्रमण टाळण्याचा प्रयत्न करा.