किडनी हेल्दी राहण्यासाठी करा सोपे उपाय
रक्त स्वच्छ करणं आणि नको असलेले विषारी घटक दूर करणं, हे किडनीचं काम असतं.
याशिवाय किडनी मानवी शरीरातील मीठ, पोटॅशियम आणि ऍसिडचे प्रमाण नियंत्रित करते.
यासाठी किडनी हेल्दी राहणं आवश्यक असतं. काही हेल्दी ड्रिंक तुम्हाला किडनी ठवण्यास मदत करतील.
दररोज 2 लिंबाचा रस प्यायल्याने किडनीत सायट्रेट वाढते आणि यातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
किडनीला हेल्दी ठेवणाऱ्या ड्रिंक तुम्ही सकाळी आणि दुपारी पिऊ शकता.
पुदिना, लिंबू ड्रिंक : एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, थोडी साखर घालून मिक्स करून प्यावे.
मसाला लिंबू सोडा : ग्लासमध्ये लिंबाचा रस, जिरे-धणे पूड, चाट मसाला, सोडा टाकून मिसळल्यास मसाला लिंबू सोडा तयार होतो.
नारळ शिकंजी : ग्लासमध्ये नारळ पाणी घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस मिसळल्यास नारळ शिकंजी तयार होते.
हे पेय किडनीसाठी खूप हेल्दी आहेत. या पद्धतीनं घेतल्यास त्याचा किडनीला फायदा होतो.