गुडघेदुखीवर करा हे रामबाण उपाय
हाडे कमकुवत आणि गुडघ्याला दुखापत झालेली असल्यास सांधे, गुडघे दुखतात.
कधीकधी गुडघेदुखीचा त्रास खूप दिवस सहन करावा लागतो. यामुळे चालणेही कठीण होते.
गुडघ्याच्या वेदनेमुळे आपल्याला अनेक आवडत्या गोष्टी करता येत नाही.
मात्र गुडघेदुखीवर काही घरगुती उपाय करून त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.
गुडघेदुखीसाठी एरंडेल तेल थोडे गरम करून थेट गुडघ्यावर लावू शकता.
गरम पाण्यात एरंडेल तेल टाकून त्यात टॉवेल बुडवा आणि नंतर टॉवेल गुडघ्याभोवती गुंडाळून विश्रांती द्या.
गुडघेदुखीवर कापूर तेलदेखील फायदेशीर आहे. हे गुडघ्यावरील ताण, इरिटेशन दूर करण्यास मदत करते.
एक कप गरम खोबरेल तेलात एक चमचा कापूर पावडर घालून गुडघ्यांवर मालिश करा.
बर्फाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून 15-20 मिनिटे गुडघ्यांवर हलके लावा.