अंगावरून पांढरं पाणी जातय? मग घरीच करा हे उपाय
ल्युकोरिया या समस्येमुळे मूत्रमार्गामधून एक चिकट पांढरा स्त्राव होतो.
यालाच आपल्याकडे अंगावरून पांढरं पाणी जाणं असे म्हटले जाते.
अस्वच्छता, मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा वारंवार लैंगिक संबंधांमुळे ही समस्या उद्भवते.
थोडा पांढरा स्त्राव ठीक असतो, मात्र जास्त स्राव होत असेल डॉक्टरांना भेटावे.
या समस्येवर काही घरगुती उपाय करून देखील तुम्ही आराम मिळवू शकता.
गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर दुधात टाकून प्यायल्याने पांढर्या स्त्रावाचा त्रास दूर होतो.
नियमितपणे एक ग्लास दुधात अर्धा चमचा तूप आणि केळी कुस्करून खाल्ल्याने आराम मिळतो.
पाण्यात भेंडी टाकून चांगले उकळू द्यावे, हे पाणी थंड करून पिल्याने समस्या दूर होते.
आवळा पावडरमध्ये मध मिसळ घालून नियमितपणे पिल्याने पांढरा स्त्राव कमी होतो.
अंजीर रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यानेही पांढर्या स्त्राव समस्या दूर होते.