मधुमेह नियंत्रित ठेवतात हे घरगुती उपाय 

भारतात मधुमेह रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

खाण्या-पिण्याची पथ्यं पाळली नाहीत, तर मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. 

सतत अशक्तपणा जाणवणं, चक्कर येणं, डोकेदुखी होणं ही मधुमेहाची लक्षणं आहेत. 

मात्र मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. 

10ml आवळा ज्यूस आणि 2gm हळद एकत्र करून दिवसातून दोनदा घेतल्यास साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं.

एक टोमॅटो, काकडी, कारल्याचं ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी घ्या, यानेही मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. 

मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने रोज बडीशेप खावी. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. 

इतर फळांपेक्षा मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने जांभूळ खाल्यानं त्यांचं शुगरचं प्रमाण कमी होतं.

स्टिव्हिया ही शूगर फ्री वनस्पती म्हणून ओळखली जाते, साखरेऐवजी मधुमेही याचे प्रमाणात सेवन करू शकतात.