शरीरात रक्त किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास अनेक रोगांचा सामना करावा लागतो.
बऱ्याचवेळा शरीरात लोहाचं प्रमाण योग्य असूनही रक्त कमी झाल्यास तो अॅनिमिया असतो.
या रुग्णांमध्ये शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात.
यासाठी रोजच्या आहारात या काही गोष्टींचा समावेश केल्यानं तुम्ही सुदृढ आणि सशक्त राहाल.
अंडी : अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट, प्रोटीन, लोहाचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे अंडी नक्की खावी.
डाळींब : डाळींबामुळे रक्तासोबत हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते, डाळींबामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई असतं.
हिरव्या पालेभाज्या : यामध्ये आयन, व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे पालकाची भाजी किंवा ते सॅलडमध्ये खावे.
बीट : बीटापासून कोशिंबीर, कच्च किंवा उकडलेलं बीट अथवा बीटाचा ज्यूसही तुम्ही घेऊ शकता.
सोयाबिन : यामध्ये प्रोटीन, लोह, फॅट असतं. त्यामुळे ताकद, वजन वाढवण्यासाठी भीजवलेलं सोयाबिन खावं.
कोबी : कोबीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असल्यानं शरीरातील हाडांना मजबूती देण्याचं काम करतं.