घरातील 'या' वस्तुंनी करा उत्तम फेस वाॅश

कच्चं दूध हे क्लिनिंग एजेंटचं काम करतं. कापसाने चेहऱ्यावर 1-2 वेळा लावा आणि पुन्हा पाण्याने धुवा. चेहरा साॅफ्ट होईल. 

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा व मानेवर गुलाब पाणी लावा. सकाळी कोमट पाण्याने धुवा.

काकडीचे काप चेहऱ्यावर घासा. काकडीच्या रसात दही मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास, चेहऱ्यावर उजाळा येतो. 

एक चमचा दही आणि थोडासा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 2 मिनिटांनी धुवा आणि त्वचा उजळेल. 

चेहरा स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर करा. पाण्यात अर्धा चमचा मध मिक्स करा आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने धुवा. 

टोमॅटो पेस्टमध्ये 1 चमचा दूध आणि लिंबूचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर ग्लो येईल. 

संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये मध, लिंबाचा रस, गुलाब रस मिक्स करून चेहरा मसाज करा. त्याने चेहऱ्यावरील घाण निघून जाते. 

एलोवेरा जेल गुलाब पाण्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. त्याने चेहरा ग्लो करेल. 

दही आणि पुदीना पेस्ट मिक्स करून चेहऱ्यावर लावा, चेहरा चांगला क्लिन होईल. 

बेसन फेस पॅक : बेसनाचा फेस पॅक बनवण्यासाठी 1 चमचे बेसनामध्ये 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा क्रीम मिसळून पेस्ट बनवा. 

आता ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!