'बेबी बम्प'शिवाय प्रेग्नन्सी
प्रेग्न्सी म्हटलं की त्याची लक्षणं दिसून येतात.
मासिक पाळी चुकणं, मळमळ, उलटी, चक्कर ही काही लक्षणं.
नंतर गर्भाच्या वाढीनुसार आईचं पोट वाढतं.
याला बेबी बम्प म्हणतात.
पण काही प्रकरणात महिलांमध्ये प्रेग्नन्सीची लक्षणंच दिसली नाहीत.
बेबी बम्पशिवायच महिलांनी अचानक बाळाला जन्म दिला.
या महिलांची मासिक पाळीही सुरू होती, त्यांचं बेबी बम्प दिसलं नाही.
आपण प्रेग्नंट आहोत
हे या महिलांनाही
माहिती नव्हती.
या प्रेग्नन्सीला
क्रिप्टिक प्रेग्नन्सी म्हणतात.
मेडिकल टेस्टिंगमध्येही ही प्रेग्नन्सी समजत नाही.