मुंबईतील हवा श्वास घेण्यासारखी राहिली नाही
हवेची गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत
नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरले आहे
मुंबईतील काही भागात रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही
दिल्लीनंतर सर्वात प्रदुषीत हवा मुंबईतील काही भागात असल्याचे जाणवत आहे
मुंबईतील तापमानात घट झाल्यानंतर शहरातील हवा गुणवत्ता पातळी कमालीची खालवली आहे
मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 322 वर होता. तर दिल्लीतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 221 वर गेला आहे
मुंबई शहरातील हवेच्या गुणवत्तेवरुन काही दिवसांपूर्वी खूप चर्चा झाली होती.
मुंबईत 14 ठिकाणी हवा तपासणी केंद्रे उभारण्यात आली असून त्यातील तीन तपासणी केंद्रे कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत.
पुढील काही दिवसात मुंबईच्या हवेची पातळी सुधारली नाही, तर आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते.