मच्छरांमुळे डेंग्यू हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांनी काय खावं आणि काय खाऊ नये, याची माहिती घेऊया...

डेंग्यू झाल्यानंतर रुग्णाने जास्तीत जास्त नारळ पाणी प्यावं. शरीरातील टाॅक्सिन्स बाहेर पडण्यास मदत मिळते.

जास्तीत जास्त संत्री खावेत, कारण त्यामध्ये व्हिटॅमीन आणि मिनरल्स जास्त असतात. 

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स खूप कमी होतात. अशामध्ये डाळिंब खाणे फायद्याचे ठरते.

डेंग्यूच्या रुग्णाला लवकर बरे होण्यासाठी पालक खूप महत्त्वाचे असते. त्यात लोह जास्त असते. 

अंडीदेखील या रुग्णांनी खाणं खूप महत्त्वाचे आहे. कारण, त्यात प्रोटीन जास्त असतात. 

तेलकट किंवा तळलेले पदार्थ डेंग्यूच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नयेत. 

चहा आणि काॅफी रुग्णांनी घेऊच नये. 

मसालेदार जेवण किंवा नाष्ता रुग्णांनी टाळावं. 

खराब झालेले अन्नपदार्थ चुकूनही खाऊ नका. कोलेस्ट्रेराॅलयुक्त अन्नपदार्थ जेवणात घेऊ नयेत. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!