दीड रुपयांपासून सुरू झालेली बीडची फेमस कचोरी

कचोरीला परिचयाची गरज नाही. हे एक अप्रतिम स्ट्रीट फूड आहे. 

कुरकुरीत कचोरी, मसाला कचोरी, कांदा कचोरी, दाल कचोरी आणि मटर कचोरी असे अनेक प्रकार खवय्ये आवडीने खातात.

बीड शहरातील जालना रोड परिसरामध्ये रघुनाथ जोशी यांनी 1989 च्या सुमारास स्वीट मार्टचा व्यवसाय सुरू केला.

त्यावेळी दीड रुपया पासून या कचोरीची जोशी यांनी विक्री सुरू केली. कचोरीचा दर आता 12 रुपये नग इतका झाला आहे.

 विशेष म्हणजे यामध्ये सर्व पदार्थ घरगुती असल्यामुळे ही कचोरी अधिकच चवदार लागते. 

मुगाची डाळ उडदाची डाळ आणि घरगुती काळा मसाला करून या कचोरीचा मसाला तयार केला जातो. 

आज घडीला अनेक स्वीट मार्ट शहरामध्ये सुरू झाले असून कचोरी विकली जात आहे.