नाशिकमध्ये छान सोनाली पान दरबारची जोरदार चर्चा आहे. 

या ठिकाणी तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब्बल 1 हजार मसाला पानांचे वेगवेगळे फ्लेवर खायला मिळतात. 

सुनील सयाजी कर्पे यांनी 1982 साली छान सोनाली पान दरबारची स्थापना केली आहे.

कोणत्या प्रकारचे पान मिळतात?
चीज चॉकलेट पान, खसखस स्पेशल पान, राजधानी एक्सप्रेस पान, रजनीकांत पान, महफिल पाननवाबी पान, नाईट कविन पान, मुमताज स्पेशल पान, 

सिल्व्हर मसाला पान, विजयवाडा पॅटर्न पान, मथुरा पॅटर्न पान, इंदोर पॅटर्न पान, चंदन मसाला पान, गुलाब मसाला पान, केशरी कस्तुरी पान या सोबतच इतरही मसाला स्पेशल पान येथे मिळतात. 

किंमत किती आहे?
25 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पांनाची किंमत आहे. तुम्ही जसे पान घ्याल तशी किंमत आहे.

ग्राहक हेच आमचे देव आहेत. आम्ही ग्राहकांची जशी पसंती असेल. तशी मसाला पान तयार करतो. ग्राहकांनी 1982 सालापासून आमच्या या मसाला पान दरबारला पसंती दिली आहे. 

या ठिकाणी पान खाण्यास येणारे ग्राहक देखील पान खाल्यानंतर आनंदी होतात. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पान शौकीनांचा राबता आहे. 

 नाशिकमध्ये जर आलात तर एकदा अवश्य छान सोनाली पान दरबारला भेट द्यावी असं छान सोनाली पान दरबारचे मालक योगेश पानकर सांगतात. 

कुठे आहे छान सोनाली पान दरबार? 
जलाराम स्विट जवळ हे छान सोनाली पान दरबार आहे.