15 व्या वर्षीच अभिनेत्रीने घेतलं कोट्यावधींचं घर
'ये है मोहब्बते' फेम बालकलाकार म्हणून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे रुहानिका धवन.
या मालिकेतील रुहानिका रुही भल्ला नावाने भूमिका करत होती.
अभिनेत्री रुहानिका कायमच चर्चेत असते.
रुहानिका सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
रुहानिकाने नुकतंच नवं घर खरेदी केलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
रुहानिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुडन्यूज शेअर केलीये.
रुहानिकाने अवघ्या 15 व्या वर्षी कोट्यावधींचं घर खरेदी केलं आहे.
रुहानिकावर सध्या कौतुकांचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
'वाहेगुरुजी आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी हे करु शकले', असं रुहानिका म्हणाली.