52 वर्षाच्या तब्बूने का केलं नाही लग्न?

बॉलिवूडमधील एक सुंदर,सोज्वळ आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तब्बूला ओळखलं जातं.

तब्बूने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आपली ओळख निर्माण केली आहे.

तब्बूचं व्यावसायिक आयुष्य फारच सुंदर आहे.पण तिचं वैयक्तिक आयुष्य अतिशय दुःखद.अभिनेत्री अनेकवेळा प्रेमात पडलीय. पण कोणतंही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

सुरुवातीला तब्बू अभिनेते संजय कपूर यांना डेट करत होती. पण त्यांच्या सिनेमाचं शूटिंग संपलं आणि हे नातंही संपुष्टात आलं.

त्यांनंतर तब्बू निर्माता साजिद खानच्या प्रेमात पडली होती.दोघे एकत्र बराच वेळ घालवत होते.

पण साजिद आपली पहिली पत्नी दिव्या भारतीला विसरू शकत नव्हते. त्यामुळे तब्बूने हे नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

नंतर अभिनेत्री साऊथ स्टार नागार्जुनच्या प्रेमात पडली.पण नागार्जुन आधीच विवाहित होता.तब्बू अभिनेत्यासोबत 10 वर्षे नात्यात होती.

पण जेव्हा 10 वर्षे होऊनही नागार्जुन आपल्याशी लग्न करायला तयार होत नाहीये. हे लक्षात आल्यानंतर तब्बूचं हेही नातं तुटलं होतं.

तब्बू म्हणते की मी सिंगल असण्याचं कारण अजय देवगन आहे. अजय आणि आपण शेजारी होतो.आणि जेव्हा कोणताही मुलगा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा अजय त्याला दम देऊन पाठवायचा

अजय आणि तब्बू सुरुवातीपासूनच एक चांगले मित्र आहेत. शिवाय त्यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.