कोण होता बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळलेला आदित्य सिंह राजपूत? 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत, सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड हादरून गेलं होतं.

अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये घडली आहे. 

अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये घडली आहे. 

अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 

घराच्या बाथरुममध्ये आदित्य मृतावस्थेत आढळून आला आहे. 

आदित्य स्प्लिस्टविला आणि गंदी बात सारख्या शोमधून प्रसिद्ध झाला होता. 

तो अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टरसुद्धा होता. त्यानं मॉडेलिंगपासून फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. 

आदित्य मुंबईतील अंधेरी परिसरात राहत होता. 

11 मजल्यावर राहत असलेल्या आदित्यचा मृत्यदेह त्यांच्या मित्रांना बाथरूममध्ये आढळून आला.

आजवर त्याने 300 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केलं होतं. अभिनय क्षेत्रात काम करत असताना त्यानं पॉप कल्चर हा त्याचा ब्रँड सुरू केला होता.