कोण आहे गार्गी फुले?
ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांनी आता राजकारणात पाऊल टाकलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
निळू फुलेंची लेक गार्गी फुले 1998 पासून नाटक आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.
प्रायोगिक नाट्य चळवळीत त्या अनेक वर्ष सक्रीय आहेत.
भारतीय नाट्यक्षेत्रात मोठे नाव असलेले सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं आहे.
गार्गी सत्यदेव दुबे यांच्याकडे काही काळ काम केले आहे.
गार्गीचं MA (Women Liberation) पर्यंत शिक्षण झालं आहे.
'मळभ', 'कोवळी उन्हे', 'श्रीमंत', 'सुदामा के चावल', 'सोनाटा', 'वासंसी जीर्णनी' सारख्या प्रसिद्ध नाटकात गार्गीने काम केलं आहे.
कलर्स मराठीवरील 'राजा राणीची ग जोडी' या मालिकेत गार्गीची भूमिका चांगलीच गाजली होती.
त्याचप्रमाणे 'सुंदरा मनामध्ये भरली', 'तुला पाहते रे', 'कट्टी बट्टी' सारख्या मालिकेत काम केलंय.
मराठी सिनेमांची साऊथने केली कॉपी
Click Here