कोण आहे मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशल

सरगम ​​कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब पटकावला आहे. 

भारताच्या सरगम ​​कौशलने अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड 2022चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. 

 सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. त्यामुळे सरगमवर खूप सारं प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मिसेस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी सरगम ​​कौशल ही जम्मू-काश्मीरची आहे.

सरगम कौशल एक शिक्षिका आणि मॉडेल आहे.

 सरगमचे 2018 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तिनं मिसेस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला. 

मिसेस वर्ल्ड बनून तिनं सिद्ध करुन दाखवलं की स्वप्नांची झेप उंच असेल तर तुम्ही विवाहित आहात की नाही हे महत्त्वाचं नाही. 

सरगम सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

विविध फोटो व्हिडीओ सरगम सोशल मीडियावर शेअर करते.