मिस युनिव्हर्सचा किताब पटकवणारी हरनाज कौर संधू कोण आहे?

तब्बल 21 वर्षांनंतर भारताला 'Miss Universe'चा किताब मिळाला.

 स्पर्धेत भारतीय तरुणी हरनाज कौर संधूनं 70 वा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. 

सोमवारी सकाळी इस्रायलमधील इलात येथे आयोजित 70व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मिस युनिव्हर्सचा किताब पटकावलेली हरनाज संधू  पंजाबमधील चंदीगड येथील रहिवासी असलेली व्यवसायाने मॉडेल आहे.

हरनाजने 2017 मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता.

यानंतर तिने मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडियाचा किताब पटकावला.

मॉडेलिंगसोबतच हरनाजने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.

हरनाजचे 'यारा दिया पु बरन' आणि 'बाई जी कुटंगे' असे दोन पंजाबी चित्रपट आहेत.

यापूर्वी, मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताने दोनदा आपले स्थान निर्माण केले आहे.

हरनाजच्या आधी 1994 मध्ये सुष्मिता सेननं 

आणि 2000 मध्ये लारा दत्ता यांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.