छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा महाविजेता विशाल निकम ठरला. 

विशाल निकमला 20 लाख धनराशी आणि ट्रॉफी मिळाली आहे.

विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994  रोजी झाला. 

तो मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा आहे. 

विशालने सांगलीतील विटा येथून भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली. 

मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले.

त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली.

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे विशालला लोकप्रियता मिळाली. 

तसेच  स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारली होती.

धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे.

आईशप्पथ तुम्ही होता म्हणून मी इथपर्यंत आलो. अशी पहिली प्रतिक्रिया विशालने ट्रॉफी जिंकल्यानंतर दिली.