अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी 'या' अभिनेत्रींच्या प्रेमात होता विराट कोहली!

सध्या IPL ला सुरुवात झाली आहे. सर्वत्र क्रिकेट आणि क्रिकेटर्सचीच चर्चा पाहायला मिळत आहे.

या क्रिकेटर्सच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्याबाबतही जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

क्रिकेटर्सच्या खाजगी आयुष्याची चर्चा होतेय आणि यामध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचं नाव नाही असं होऊच शकत नाही.

अनुष्का आणि विराटची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

अनेक लोक या दोघांना इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून ओळखतात.

पण फारच कमी लोकांना माहिती असेल,अनुष्कापूर्वी विराटने आणखी दोन अभिनेत्रींना डेट केलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाला डेट करत होता. पण हे नातं फारकाळ टिकलं नाही.

त्यांनंतर विराट ब्रज़िलियन अभिनेत्री इजाबेल लेटच्या प्रेमात पडला होता. परंतु या दोघांचादेखील ब्रेकअप झाला.

या दोघींनांतर विराटच्या आयुष्यात अनुष्काची एंट्री झाली होती. या दोघांनी संसार थाटत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.