अखेर 2 वर्षांनी वीणाने दिली शिववरील प्रेमाची कबुली!
बिग बॉस मराठी 2 च्या घरातील लव्ह बर्ड्स अर्थात शिव ठाकरे आणि वीणा जगताप.
घरात दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली. दोघांनी एकमेकांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं.
दोघांनी एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली होती.
बिग बॉसच्या घरात तयार झालेलं शिव आणि वीणाचं नातं मात्र काही दिवसात संपुष्टात आल्याचं समोर आलं होतं.
दोघांनी या विषयी बोलणं देखील टाळलं होतं. मात्र अखेर 2 वर्षांनी खरं प्रेम प्रेक्षकांसमोर आलं आहे.
वीणानं स्वत: शिव वरचं प्रेम व्यक्त केलं आहे.
घरात सुरू असलेल्या वादावादीमुळे तो स्वत:ला फार एकट समजत होता. मात्र त्याच्या या एकटेपणात वीणा त्याच्यासाठी धावून आली
वीणाने 'वाघ आहेस तू, हग्स. रडू नाही अजिबात मी आहे सोबत नेहमी',असं म्हणत शिवसाठी प्रेम व्यक्त केलं आहे.
वीणानं शेअर केलेल्या या पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.