अभिनेता वरुण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
वरुणने या चित्रपटात ‘भेडिया’ म्हणजेच लांडग्याची भूमिका साकारली होती.
दिनेश विजानचा ‘भेडिया’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.
वरुण धवन इतर बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी सुट्टीवर गेला आहे.
पत्नी नताशा दलालबरोबर तो सध्या जंगल सफारी एन्जॉय करत आहे.
वरुण धवनचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात भेडिया अभिनेता थेट वाघासमोर आहे.
हा व्हिडीओ शेअर करत वरुणने जेव्हा भेडिया टायगरला भेटतो असा कॅप्शन दिला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वरुणच्या या पोस्टवर अभिनेता अर्जुन कपूरने कमेंट केली आहे की 'कॅप्शन छान आहे.'