उर्वशीच्या गळ्यात ऋषभची चेन...फोटो पाहून रंगली चर्चा
सध्या सगळीकडेच अभिनेत्री उर्वशी रौतेलाची चर्चा जोरात सुरु आहे.
तिचं आणि ऋषभचं प्रकरण काही केल्या शांत होत नाही. काही ना काही कारणामुळे त्यावर चर्चा होत राहते.
उर्वशी रौतेलाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क लावायला सुरुवात केली
या फोटोत लक्षवेधी ठरतेय ती उर्वशीच्या गळ्यातील चेन
उर्वशी रौतेलाने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती एका ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे.
नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या व्हिडिओतील उर्वशीच्या गळ्यातील चेन ऋषभ पंतची आहे.
या फोटोमुळे उर्वशी आणि ऋषभ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.
सोशल मीडियावर या दोघांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
या फोटोमुळे उर्वशी आणि ऋषभचं नक्की काय चाललंय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.