शेवटच्या सहा तासात नक्की काय घडलं तुनिषासोबत?

अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली

या दु:खद बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मृत्यूच्या अवघे 6 तास आधी तुनिषाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते.

तुनिशा शर्माचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये शूटिंगपूर्वी ती तयार होत आहे, तसेच टीमशी संवाद साधत आहे.

मात्र या फोटोतून देखील ती खूश नसल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे.

 तुनिषाने शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जे त्यांच्या ध्येयाने प्रेरित आहेत, त्यांना कोणी कधीच थांबवू शकत नाही.'

तुनिषाच्या मृत्यूनंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की 6 तासात असे काय घडले की तिने आपले जीवन संपवले.

 तुनिषाच्या जाण्याने सर्वांनांच जबर धक्का बसला असून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.