समुद्रकिनारी शिल्पीचं बोल्ड फोटोशूट !

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील वहिनीसाहेब या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.

धनश्रीनं आपल्या कनखर आवाजानं आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

धनश्री सध्या 'तू चाल पुढं' मालिकेत शिल्पी ही  भूमिका साकारत आहे.

तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

धनश्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

नुकतंच तिने असं फोटोशूट शेअर केलं आहे ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

धनश्रीने समुद्रकिनारी बोल्ड अंदाजात फोटोशूट केलं आहे.

धनश्रीचे चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून ते यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

तुम्हाला धनश्रीचा हा बोल्ड अंदाज कसा वाटला?