गिरगावची लेक कुंजिकाचा मराठमोळा अंदाज
ती परत आलीये फेम अभिनेत्री कुंजिका काळवीट
स्वामिनी मालिकेतून कुंजिकानं टेलिव्हिजनवर पदार्पण केलं.
त्यानंतर कुंजिका ती परत आलीये या मालिकेत दिसली.
कुंजिकानं तिच्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली.
कुंजिकाच्या सौंदर्याची भुरळ नेहमीच तिच्या चाहत्यांवर पाहायला मिळते.
कुंजिकाचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना विशेष भावतो.
मुंबईच्या गिरगावात लहानाची मोठी झालेली कुंजिका अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत असते.
गिरगावच्या मिरवणूकांमध्ये कुंजिका मोठ्या उत्साहानं सहभागी होत असते.
मध्यंतरी कुंजिकानं गळ्यात मंगळसूत्र घालून फोटो शेअर केला होता. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चां सुरू झाल्या होत्या.
कुंजिका सोशल मीडियावरही सक्रीय असून नुकताच तिचा एक सिनेमाही युट्यूबर रिलीज झालाय.