या 7 बॉलिवूड सेलिब्रेटींचा मोडलाय साखरपुडा!
बॉलिवूड सेलिब्रेटी व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असतात.
आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत ज्यांचा साखरपुडा तर झाला पण हे नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही.
२००२ मध्ये अभिषेक आणि करिष्मा कपूरचा साखरपुडा झाला होता. मात्र कौटुंबिक कारणामुळे हे नातं लग्नापूर्वीच संपलं.
सलमान खान-संगीता बिजलानीने तर आपल्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. ऐनवेळेला हे लग्न मोडलं होतं.
साजिद खान-गौहर खाननेसुद्धा साखरपुडा उरकला होता. मात्र त्यांचं लग्न नाही होऊ शकलं.
रिपोर्ट्सनुसार विवेक ओबेरॉयने गुलप्रीत गिलसोबत साखरपुडा केला होता. मात्र हे नातं संपुष्ठात आलं.
रविना टंडन-अक्षय कुमारने गुपचूप साखरपुडा केला होता. मात्र लग्नापूर्वी दोघे विभक्त झाले.
बिग बॉस फेम करिश्मा तन्ना-उपेन पटेल यांनीसुद्धा साखरपुड्यानंतर विभक्त व्हायचा निर्णय घेतला होता.
राखी सावंतने इलेश परुजनवालासोबत साखरपुडा केला होता. मात्र हे नातंही मोडलं होतं.