अक्षय कुमार ते सलमान खान... या सेलेब्सचं खरं नाव आहे भलतंच!

अनेक बॉलिवूड सेलेब्जना आपण त्यांच्या बदललेल्या नावाने ओळखतो. त्यांची ही नावंच त्यांची खरी ओळख बनली आहेत

हरिवंशराय बच्चन यांनी अमिताभ यांचं नाव इन्कलाब श्रीवास्तव असं ठेवलं होतं. बॉलिवूडमध्ये प्रवेशाआधी ते बदलून अमिताभ बच्चन असं करण्यात आलं.

पन्नाशी उलटली तरी सुपरस्टार असलेल्या सलमान खानचं खरं नाव अब्दुल राशिद खान असं आहे. फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी ते सलमान असं करण्यात आलं.

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्नांचं नाव जतिन असं होतं. त्यांनी बदललं तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल, की हे नाव किती लोकप्रिय होईल!

राजीव हरिओम भाटियाने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी आपलं नाव अक्षय कुमार असं केलं. पुढे आपल्या कामामुळे अक्षय कुमारने खूप नाव कमावलं आहे.

डान्सिंग स्टाइल आणि अ‍ॅक्शनमुळे 80चं दशक गाजवलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचं खरं नाव गौरंगा चक्रवर्ती असं होतं.

बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानचं मूळ नाव साजिद अली खान असं आहे.

फिल्मफेअर लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्काराने गौरवण्यात आलेले दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचं खरं नाव रवी कपूर असं होतं.

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी मोहम्मद युसूफ खान हे मूळ नाव सिनेमात कधीच वापरलं नाही. Debutपासूनच त्यांनी दिलीप कुमार अशी ओळख निर्माण केली.

आपल्या पीळदार शरीरयष्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे.

याशिवाय, मल्लिका शेरावतचं मूळ नाव रीमा लांबा, तब्बूचं तबस्सुम हाश्मी, तर प्रीती झिंटाचं नाव प्रीतम सिंग झिंटा असं आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?