'द केरळ स्टोरी'चं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
या चित्रपटावरुन देशभरात वादसुद्धा निर्माण झाला आहे.
सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड निर्माण केली आहे.
५ मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे.
परंतु या वादाचा फायदा सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी होत असल्याचं म्हटलं जात आहे.
या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड सस्पेन्स आहे.
रिलीजच्या फक्त ६ दिवसांत या चित्रपटाने बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.
काल सहाव्या दिवशी चित्रपटाने गेल्या शुक्रवार आणि शनिवारपेक्षा जास्त कमाई केली आहे.
या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 68.86 कोटी इतकं झालं आहे.