तब्बल पाच मांजरींची आई आहे ही मराठी अभिनेत्री!

जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

जुईची 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय  ठरली आहे.

पण जुईबद्दल आज एक भन्नाट गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जुईला प्राण्यांची खूपच आवड आहे. तिच्या घरी मांजरं आणि कुत्री आहेत.

जुईकडे सध्या छकुली, बंडू, बच्चू, चिंगू आणि मुन्ना ही पाच मांजरं आहेत.

त्यांच्याच जोडीला  जुईकडे बाबा, माऊ आणि बुट्टू ही तीन कुत्री आहेत.

पाच मांजरं आणि तीन कुत्र्यांसाठी तिने गॅलरीत छोटंसं  घर बनवलं आहे.

कामाचा ताण घालवण्यासाठी रिकाम्या वेळेत जुई पाच मांजरं आणि कुत्रींसोबत वेळ घालवत असते.

प्राणिप्रेमाचा हा वारसा तिला तिच्या आईबाबांकडून आला आहे.

जान्हवीच्या बहिणीचा बिकिनीत कुल अंदाज!

Heading 3

Click Here