मला प्रचंड माज, असं का म्हणाली तेजस्विनी?
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सतत चर्चेत असते.
अभिनेत्रीशिवाय तेजस्विनी एक निर्मातीदेखील आहे.
तेजस्विनीने सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या ऑडिओ पॉडकास्टसाठी नुकतीच विशेष मुलाखत दिली.
या मुलाखतीमध्ये तेजस्विनीने अनेक खुलासे केले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत तिच्याबद्दल जे गैरसमज पसरले आहेत याविषयी तेजस्विनीने स्पष्टीकरण दिलं आहे.
तेजस्विनी म्हणाली, मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते कलाकारांना वेळेवर पैसे देत नाहीत असं मी बऱ्याचदा ऐकलं आहे.
बरेच लोक मला माजोरडी म्हणतात, असं तेजस्विनी म्हणाली.
माझ्यात माज असल्याचं अनेकांना वाटतं पण माझ्यासोबत काम केलेले लोक असं कधीच म्हणणार नाहीत.
माझ्या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मी वेळच्या वेळी पैसे दिले असल्याचंही तेजस्विनी म्हणाली.