बिग बॉस हिंदी ची विजेती तेजस्वी प्रकाश नेहमीच चर्चेत असते.
तेजस्वी आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे.
पण फार कमी लोकांना माहिती आहे कि तेजस्वी मराठी आहे.
काही दिवसांपूर्वीच तिचा "मन कस्तुरी रे" हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
आता तेजस्वीच्या अजून एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
तेजस्वी लवकरच रोहित शेट्टी निर्मित 'स्कुल, कॉलेज आणि लाईफ' या सिनेमात झळकणार आहे.
तेजस्वीच्या या सिनेमात आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील प्रेम पाहायला मिळणार आहे.
तिच्यासोबत या सिनेमात जितेंद्र जोशी देखी दिसणार आहे.
आता प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे.