मराठमोळा अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.

सुयश आणि आयुषीचे अनेक फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत.

त्यांच्या लग्नाचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.

मराठीतील हे क्यूट कपल लग्नाच्या जोड्यात खुपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मेहंदी, हळद तसेच संगीत याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुयश टिळक 'तू तिथे मी' मालिकेतून घराघरात पोहोचला होता.

काहीदिवसापूर्वी,  'तुझ्यात जीव रंगला'फेम अक्षया देवधरसोबतही त्याच नाव जोडलं गेलं होतं. 

आयुषीच्या वाढदिवसाला साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.

Your Page!

आयुषी भावे ही अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर आहे.

युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली होती.