Birthday Special: वाढदिवशी पाहाच सुशांतचे हे खास चित्रपट

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मेहनतीच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झाला होता

TV पासून सुरुवात करून त्याने लवकरच बॉलिवूडमध्येही स्थान निर्माण केलं.

दुर्दैवाने या प्रतिभावान अभिनेत्याने ऐन उमेदीच्या काळात जीवन संपवलं.

21 जानेवारी या त्याच्या जन्मदिनानिमित्त त्याच्या काही सिनेमांवर एक नजर

2013 साली 'काई पो चे'मधून सुशांतने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

त्यातल्या त्याच्या ईशान भट्ट या क्रिकेटरच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.

'शुद्ध देसी रोमान्स'मधल्या त्याच्या रघू राम या पात्राचीही चर्चा झाली.

2014 सालच्या PK मध्ये त्याने सर्फराझ युसूफ ही भूमिका निभावली होती.

अनुष्का शर्मासोबतची त्याची ही इमोशनल भूमिका सर्वांना आवडली होती.

2015च्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'मध्ये सुशांतने मुख्य भूमिका केली. 

M. S. Dhoni या 2016 सालच्या सिनेमासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती.

त्याची मेहनत फळाला आल अन् सिनेमाचं कौतुक झालं आणि अनेक पुरस्कारही मिळाले

2017चा 'राबता' मात्र फ्लॉप झाला. त्यात सुशांत डबल रोलमध्ये दिसला होता

'केदारनाथ'मध्ये तो भक्तांना पालखीतून यात्रा घडवणारा मन्सूर खान होता.

2018च्या या सिनेमात त्याच्यासह सारा अली खान होती. 

सुशांतच्या 2019 सालच्या छिछोरे सिनेमाला तर National Award मिळाला. 

छिछोरेने पहिल्या दिवशी 7 कोटी आणि 2 आठवड्यांत 100 कोटींचा व्यवसाय केला

वेलकम टू न्यूयॉर्क, सोनचिरिया, ड्राइव्ह हे सुशांतचे आणखी काही सिनेमे. 

2020चा 'दिल बेचारा' हा अखेरचा सिनेमा त्याच्या मृत्यूनंतर रिलीज झाला.

कोरोनामुळे OTT वर रिलीज झालेल्या या सिनेमाने व्ह्यूअरशिपचा विक्रम केला

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?