जावयानंतर सुनील शेट्टींच्या होणाऱ्या सुनेची चर्चा! 

आणखी पाहा...!

Heading 3

सुनील शेट्टी हे बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहेत.

त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मुलगी आथिया आणि मुलगा अहाननेसुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.

जानेवारीमध्ये आथिया शेट्टी भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न बंधनात अडकली आहे.

या दोघांच्या लग्नाची तुफान चर्चा झाली होती.

दरम्यान आता सुनील शेट्टींची होणारी सून अर्थातच अहानच्या गर्लफ्रेंडची चर्चा होत आहे.

अहान शेट्टी तानिया श्रॉफच्या प्रेमात पडला आहे.गेली अनेक वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

दोघेही सतत सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

तसेच तानिया आणि अहान एकत्र सुट्टीसाठी विदेशातही जात असतात.

जावयानंतर आता सुनील शेट्टी यांच्या होणाऱ्या सुनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.