Heading 3
सुनील शेट्टी हा बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे.
या वयातही सुनील शेट्टींचा फिटनेस पाहून चाहत्यांना प्रेरणा मिळते.
सुनील शेट्टी अजूनही अभिनयक्षेत्रात चांगलेच सक्रिय आहेत.
लवकरच ते हेरा फेरी ४ मध्ये दिसणार आहेत.
याशिवाय सध्या सुनील शेट्टी 'हंटर - टूटेगा नहीं तोडेगा' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत.
या दरम्यानच सुनील शेट्टींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सुनील शेट्टी यांनी नॉर्वेजियन डान्स ग्रुपसोबत ग्रोव्हज यांच्यासोबत एक डान्स रील केलं आहे.
या रिलमध्ये सुनील शेट्टी यांनी त्याच्याच चित्रपटातील 'आँखों में बस हो तुम' या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे.
या वयात सुनील शेट्टींचा डान्स पाहून चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत.