भूमिकेसाठी कायपण! लतिकाने थेट चालवला ट्रक!

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.


या मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईकने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलंय.

सध्या मालिकेला नवं वळण लागलं आहे.

मालिकेत सध्या अभ्याने एक्झिट घेतली असून लतिका त्यांच्या मुलीला वाढवतेय.

अभ्या नसल्यामुळे लतिका अजूनच स्ट्रॉंग झालेली पाहायला मिळतेय.

आता मालिकेत एका सीनसाठी लतिका चक्क ट्रक चालवणार आहे.

अक्षयाने हा ट्रक चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

विशेष म्हणजे लतिकाला आधीपासून गाडी चालवता येत नाही. तरी तिने भूमिकेसाठी ट्रक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.

चाहते अक्षयाच्या या धाडसाचं कौतुक करत आहेत.