"आता ऐतिहासिक भूमिका बापजन्मात करणार नाही"
हर हर महादेव सिनेमाचा वाद चांगलाच वाढला आहे.
सिनेमातील इतिहास मोडून तोडून सांगितल्याचा आरोप करण्यात आलाय.
सिनेमा झी मराठीवर प्रदर्शित होणार असल्याने कोल्हापुरातील शिवभक्तांनी सुबोध भावेची भेट घेतली.
शिवभक्तांनी सुबोधकडे सिनेमातील आक्षेपार्ह सीन वगळण्याची मागणी केली.
तेव्हा 'मी यापुढे कोणताही बायोपिक करणार नाही', अशी भूमिका सुबोधनं घेतली.
सुबोधनं म्हटलं, 'माझं महाराजांवरील प्रेम आयुष्यभर राहील.'
'त्यांच्या सिनेमातून मला जे मिळालं ते मरेपर्यंत मी करत राहणार'
'पण इथून पुढे ऐतिहासिक सिनेमात मी कोणतीही भूमिका बापजन्मात करणार नाही'.
'आता शुटींग सुरू असलेला सिनेमा शेवटचा बायोपिक सिनेमा असेल'.
सुबोध भावेच्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांना धक्का बसलाय.
सुबोधनं याआधी 'लोकमान्य', 'बालगंधर्व', 'काशिनाथ घाणेकर' सारखे बायोपिक केलेत.
शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर सुबोध तुकारामांची भूमिका साकारणार आहे.
तुकारामांचा सिनेमा हा सुबोधचा शेवटचा ऐतिहासिक सिनेमा असेल.