साई पल्लवीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
दिवसेंदिवस दाक्षिणात्य चित्रपटांची जादू वाढत चाललेली पहायला मिळत आहे.
दाक्षिणात्य कलाकारांचीही क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे.
दाक्षिणेतील सुंदरी साई पल्लवी सतत चर्चेत असते.
साई पल्लवीविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
साई पल्लवी लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे.
निर्माता अल्लू अरविंदच्या 'रामायण' चित्रपटातून साई पल्लवी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.
2019 साली या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.
या बातमीमुळे साई पल्लवीचे चाहते तिला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
अद्याप साई पल्लवीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.