दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा नेहमीच चर्चेत असते.
नुकतंच तिनं पती विग्नेश सोबत अम्मन मंदिराला भेट दिली.
नयनताराला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती.
गर्दीतील लोक मोबाईलमध्ये नयनताराचे फोटो व व्हिडिओ घेत होते.
यावेळी एका चाहत्यानं केलेल्या कृत्यानं नयनतारा भलतीच रागावली.
नयनतारानं चाहत्याला थेट मोबाईल फोडण्याची धमकीच दिली.
नयनताराच्या या धमकीची सर्वत्र चर्चा होत आहे.
लवकरच नयनतारा शाहरूख खानसोबत चित्रपटात दिसणार आहे.
बॉलीवूड चित्रपटात नयनताराला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.