सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचं दुसरं लग्नही मोडलं?

साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीने गेल्यावर्षी दिग्दर्शक रवींद्र चन्द्रशेखरसोबत लग्न केलं होतं. 

सोशल मीडियावर या दोघांच्या जोडीचं अनेकांनी ट्रोल केलं होतं. 

मात्र या दोघांनी त्याचा आपल्या नात्यावर कोणताही प्रभाव पडू दिला नव्हता. 

महालक्ष्मी सतत पती रवींद्रसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

दरम्यान अभिनेत्रीच्या या दुसऱ्या लग्नातसुद्धा अडचणी येत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 

महालक्ष्मी आणि रवींद्र हे अवघ्या काहीच महिन्यात एकमेकांपासून विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान आता अभिनेत्रीने पती रवींद्रसोबतच एक फोटो शेअर करत या केवळ अफवा असल्याचं सिद्ध केलं आहे. 

अभिनेत्रीने दोघांचा फोटो शेअर करत आपण सुखाने संसार करत असल्याचं उघड केलं आहे. 

 त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं तिने म्हटलंय.